देश भारतीय जवानांसोबत - अरविंद केजरीवाल

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 सप्टेंबर 2016

नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी संपूर्ण देश भारतीय जवानांच्या बरोबर असल्याचे म्हटले आहे.

उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 17 जवान हुतात्मा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर लष्कर आणि संरक्षण मंत्रालयाकडून आज (गुरुवार) पत्रकार परिषद घेण्यात आली. या परिषदेत रणबीरसिंग यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील हल्ल्यांबाबत माहिती दिली. भारतीय लष्कराकडून सर्जिकल स्ट्राईक (नियंत्रित हल्ले) करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

या नंतर देशभरातून भारतीय लष्कराचे अभिनंदन करण्यात येत आहे. उरी हल्ल्याचा बदला घेतल्याचे बोलले जात आहे. यातच केजरीवाल यांनी म्हटले आहे की, भारत माता की जय, आज पूर्ण देश भारतीय जवानांच्यासोबत आहे. 

Web Title: India stands with Indian Army, says Arvind Kejriwal