पाकिस्तानकडून सीमेवर ३ निष्पाप लोकांची हत्या; भारताकडून समन्स

टीम ई सकाळ
Sunday, 19 July 2020

जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून तीन निष्पाप भारतीय लोकांची हत्या केल्याप्रकरणी भारताकडून पाकिस्तानला समन्स जारी करण्यात आले आहे.

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये सीमेवर पाकिस्तानकडून तीन निष्पाप भारतीय लोकांची हत्या केल्याप्रकरणी भारताकडून पाकिस्तानला समन्स जारी करण्यात आले आहे. एलओसीवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात या तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जम्मू काश्मीरच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या संघर्षविराम उल्लंघनात एका लहान मुलासह तीन निर्दोष नागरिकांची हत्या झाली आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

शुक्रवारी रात्री पाकिस्तानने केलेल्या या कृतीला भारताकडून कडाडून विरोध केला आहे. या घटनेत एका मुलासह तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विदेश मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या निशाणावर असलेले हे सारे जण एकाच कुटुंबातील आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
-----------
उत्तर भारताला पावसाचा जोरदार तडाखा; आसाममध्ये पूर
------------
राजस्थानच्या राजकारणात नवा ट्विस्ट; गृह खात्याने मागितले फोन टॅपिंग प्रकरणाचे रिपोर्ट
-------------
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सशस्त्र दलांनी जाणून बुजून निर्दोष नागरिकांना आपल्या निशाण्यावर घेतलं असून याबाबत भारताने कडाडून विरोध केला आहे. यावर्षी पाकिस्ताने २७११ हून अधिक वेळा सीजफायरचं उल्लंघन केलं आहे. यामध्ये २१ भारतीयांचा मृत्यू झाला आहे तर ९४ लोकं जखमी झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Summons Pak Envoy Over Killing Of 3 Civilians In Jammu And Kashmir