
नवी दिल्ली : जपानला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका, चीन आणि जर्मनी हेच देश आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात भारत लवकरच चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू शकतो, असे भाकीत वर्तविले होते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार चार ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेल्याची माहिती नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम यांनी दिली आहे.