नवी दिल्ली - दहशतवादविरोधी मोहिमेची धार वाढविण्यासाठी संरक्षण साहित्याची आणखी खरेदी करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. ड्रोन, रिमोटली पायलेटेड व्हेइकल, बॅलेस्टिक हेल्मेट, मध्यम आणि अवजड क्षमतेची लढाऊ वाहने, रायफल तसेच नाईट व्हिजन गॉगल, बुलेटप्रूफ जॅकेट्स यांची खरेदी केली जाणार असून यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याचे संरक्षण खात्याकडून सांगण्यात आले आहे.