India In SpaceSakal
देश
India In Space : भारतीयांना अंतराळ क्षेत्रात मोठी संधी : नरेंद्र मोदी
PM Modi : राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ प्रवासी गट तयार होत असल्याची घोषणा करत, देशातील तरुण, स्टार्टअप्स आणि खासगी क्षेत्राला अंतराळ स्वप्नांची नवचेतना दिली.
नवी दिल्ली : अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी निर्माण होत असून भारताचा अंतराळ प्रवाशांचा समूह तयार करण्यात येत असल्याची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने बोलताना केली.