
नवी दिल्ली: इन्स्टाग्राम रील्स आणि शॉर्ट्सच्या जमान्यात सेल्फी हा प्रकार केवळ 'लाईक्स'पुरता मर्यादित राहिलेला नाही. सेल्फीच्या हव्यासाची अनेकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. ‘द बार्बर लॉ फर्म’ने (The Barber Law Firm) केलेल्या एका नवीन अभ्यासात जगभरातील सेल्फीसाठी सर्वात धोकादायक असलेली ठिकाणे समोर आली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, सेल्फीमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारत जागतिक स्तरावर अव्वल आहे.