
India Vs Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. दहशवाद पोसण्याच्या पाकिस्तानच्या भूमिकेवर जगभरातून टीका होतेय. त्यातच आता संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकचा बुरखा फाडला आहे. संयुक्त राष्ट्रात भारताच्या उपस्थायी प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकिस्तानला फटकारलं असून देशाचा उल्लेख करताना त्यांनी दुष्ट देश असं म्हटलं आहे.