

India Reaffirms Support for Afghanistan's Sovereignty
Sakal
नवी दिली : रशियाकडून तेल खरेदी करण्यावरून भारत आणि अमेरिकेदरम्यान निर्माण झालेला आर्थिक तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेने इराणमधील चाबहार बंदरावर लादलेल्या निर्बंधांमध्ये सहा महिन्यांची सूट दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयातर्फे आज ही माहिती देण्यात आली. यासोबतच, पाकिस्तान- अफगाणिस्तानमधील स्फोटक परिस्थितीवर भाष्य करताना भारताने सीमेपलीकडून दहशतवाद पसरविल्याबद्दल पाकिस्तानला खडेबोल सुनावले असून अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वाला पाठिंबाही जाहीर केला आहे.