US Sanctions on Russian Oil
esakal
US Sanctions on Russian Oil : अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे जागतिक तेल व्यापारात खळबळ उडाली असून भारतासाठीही हा मोठा धक्का ठरला आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील प्रमुख तेल कंपन्या, विशेषतः रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) आणि सरकारी तेल उपक्रमांनी रशियाकडून कच्च्या तेलाची आयात तात्पुरती थांबवण्याची तयारी सुरू केली आहे.