
‘गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर भारत-चीन दरम्यान द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. ताबारेषेमध्ये एकतर्फी बदल कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. दोन्ही देश निर्णायक वळणावर असून या परिस्थितीत घेतला जाणारा कोणताही निर्णय संपूर्ण जगावर परिणाम करणारा असेल,’ अशा सज्जड शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज चीनला ठणकावले.
नवी दिल्ली - ‘गलवान खोऱ्यातील हिंसेनंतर भारत-चीन दरम्यान द्विपक्षीय संबंध बिघडले आहेत. ताबारेषेमध्ये एकतर्फी बदल कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाही. दोन्ही देश निर्णायक वळणावर असून या परिस्थितीत घेतला जाणारा कोणताही निर्णय संपूर्ण जगावर परिणाम करणारा असेल,’ अशा सज्जड शब्दांत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज चीनला ठणकावले. तसेच हे संबंध सुधारण्यासाठी अष्टसूत्री पर्यायांचेही सूतोवाच केले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ताबारेषेवरील शांतेसाठी सर्व द्विपक्षीय कराराचे गांभीर्याने पालन, आशियातील पुढे येणाऱ्या शक्ती या नात्याने दोन्ही देशांनी परस्परांच्या इच्छा आकांक्षांचा आदर करणे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा या अष्टसूत्रीमध्ये समावेश आहे. चीनच्या अध्ययनाशी संबंधित परिषदेच्या ऑनलाइन संमेलनात बोलताना जयशंकर यांनी मागील वर्षी जूनमध्ये गलवान खोऱ्यातील हिंसक घटनांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर गंभीर परिणाम झाल्याचे सांगितले.
Edited By - Prashant Patil