esakal | मोदींच्या दौऱ्यात लिहीला जाणार भारत रशिया मैत्रीचा 'नवा अध्याय'!
sakal

बोलून बातमी शोधा

मोदींच्या दौऱ्यात लिहीला जाणार भारत रशिया मैत्रीचा 'नवा अध्याय'!

काश्‍मीरप्रश्‍नी भारताच्या मागे भक्कमपणे उभ्या राहिलेला रशिया व भारत यांच्यातील मैत्रीचा नवा अध्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी रशिया दौऱ्यात लिहीला जाणार आहे.

मोदींच्या दौऱ्यात लिहीला जाणार भारत रशिया मैत्रीचा 'नवा अध्याय'!

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली ः काश्‍मीरप्रश्‍नी भारताच्या मागे भक्कमपणे उभ्या राहिलेला रशिया व भारत यांच्यातील मैत्रीचा नवा अध्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी रशिया दौऱ्यात लिहीला जाणार आहे. येत्या 4 व 5 तारखेला "ईस्टर्न इकोनॉमिक्‍स फोरम'च्या बैठकीच्या निमित्ताने रशियातील व्लॅदीबॉस्टोक येथे भारत निर्यातीच्या नव्या क्षेत्रांच्या शक्‍याशक्‍यतेची तपासणी करेल. यानिमित्ताने पंतप्रधान मोदी व रशियाचे अध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांच्यात होणारी शिखर बैठक दोन्ही देशांच्या सामरीक मैत्रीचे धागे आणखी बळकट करणारे ठरेल, या दृष्टीतून जाणकार या भेटीकडे पहात आहेत.

पंतप्रधान मोदींना आणखी एक मानाचा पुरस्कार

काश्‍मीरचे कलम 370 मोदी सरकारने एका फटक्‍यात रद्द केल्यावर तळतळाट झालेल्या पाकिस्तानने जगभरात जो आरडाओरडा सुरू केला त्याला भीक न घालता भारतामागे ठामपणे उभ्या राहणाऱ्या देशांत रशिया अग्रभागी होता व आहे. आपल्या या भक्कम मित्राचे पाठबळ भारतासाठी अत्यंत मोलाचे ठरले. या पार्श्‍वभूमीवर मोदींच्या रशिया दौऱ्यात उभय देशांदरम्यानच्या संरक्षण संबंधांबरोबरच उर्जा, रेल्वे, अंतरिक्ष तंत्रज्ञान, कृषी व हिरेव्यापारासारख्या क्षेत्रांसाठीही भरीव चर्चा होणार आहे. साहजिकच मोदींचा अवघ्या 36 तासांचा हा दौरा आर्थिक मंदीच्या वादळास तोंड देण्याबाबतही भारतासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. 

पुतीन : एकाधिकारशाहीची दोन दशके

परराष्ट्रसचिव विजय गोखले यांनी मोदींच्या प्रस्तावित व्लॅदीबॉस्टोक दौऱ्याबाबत माहिती दिली. परराष्ट्र प्रवक्ते रवीशकुमार हेही उपस्थित होते. पुतीन यांच्यात होणारी ही पाचवी भेटवार्ता ठरेल. ईस्टर्न इकोनॉमिक्‍स फोरम' च्या बैठकीत जपान, मंगोलिया व मलेशीया आदी देशही सहभागी होत आहेत. या प्रकारची ही विसावी परिषद आहे. मोदी येत्या 4 तारखेला रशियात जाताच पुतीन यांच्यासह युध्दनौका स्थळाला भेट देतील. रात्री भोजनाच्या व दुसऱ्या दिवशीच्या शिखर द्विपक्षीय बैठकीच्या निमित्तानेही दोघांत वाटाघाटी होतील. 

रशियाचा राजकीय 'गोल'

पंतप्रधानांबरोबर या दौऱ्यात वाणिज्यमंत्री पियूष गोयल, 15 उद्योगपतींचे शिष्टमंडळ तसेच गोवा, गुजरातसह चार राज्यांचे व्यापार प्रतीनिधीही जात आहेत. कृषी, रेल्वे क्षेत्रांतील भारताची निर्यातवृध्दी व हिरेव्यापारात रशियातील अनेक प्रदेशांना भेडसावणाऱ्या मनुष्यबळाच्या कमतरतेबाबतही भारताकडून मदतीचा सक्रिय हात पुढे केला जाऊ शकतो.

loading image
go to top