India Defense: संरक्षणसज्जतेला नवसामर्थ्याचे पंख! देशातच बनणार लढाऊ विमानांचे डिझाईन; एएमसीए निर्मिती प्रकल्पास संरक्षणमंत्र्यांची मंजुरी

Fighter Jet: पाचव्या पिढीतील अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या निर्मिती प्रकल्पास संरक्षणमंत्र्यांनी आज मंजुरी दिली. या विमानांचे डिझाईन देशातच बनविण्यात येणार असून हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
AMCA fighter jet
AMCA fighter jetESakal
Updated on

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: भारताने संरक्षणसज्जतेमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. ‘तेजस’पाठोपाठ पाचव्या पिढीतील अत्याधुनिक मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमानांच्या (एएमसीए) निर्मिती प्रकल्पास संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज मंजुरी दिली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून मंगळवारी याबाबतची घोषणा करण्यात आली. देशातील एअरोस्पेस औद्योगिक क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जातो. या प्रकल्पासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घेण्यात येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com