
'तुम्ही जिंका किंवा हारा, मोदी प्रोत्साहन वाढवतात': पुलेला गोपीचंद
नवी दिल्ली : भारतीय बॅडमिंटन संघाने ७३ वर्षांत पहिल्यांदाच थॉमस चषकाचे विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला असून सर्वांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर प्रत्येकाची वैयक्तिकरित्या चौकशी केली असून संघाचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी मोदींनी केलेल्या कौतुकामुळे प्रोत्साहन वाढत असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान भारतीय संघाने थॉमस कप जिंकल्यावर मोदींनी त्यांचे कौतुक करताना सांगितलं की, "थॉमस कप जिंकून तुम्ही इतिहास रचला आहे. याआधी लोकांना थॉमस चषकाबद्दल माहिती नव्हती, तुमच्यामुळे लोकांना या चषकाबद्दल माहिती झाली. आणि हा कप जिंकून तुम्ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे." दरम्यान मोदींनी केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं असं संघाचे प्रमुख प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा: अकबराच्या एका मंत्र्याने काशी विश्वनाथच्या मंदिराचा पहिला जीर्णोद्धार केला होता
"तुम्ही जिंका किंवा हारा, मोदी सर्वांचं कौतुक करतात, त्यांचं प्रोत्साहन वाढवतात. त्याचबरोबर ते खेळांसहित इतर गोष्टींची चर्चा करतात ज्या खेळाडूंना कनेक्ट करत असतात." असं ते म्हणाले आहेत.
दरम्यान "उपांत्यपूर्व फेरीदरम्यान दडपण होतं कारण आम्हाला माहित होतं की आम्ही हरलो तर पदक मिळणार नाही आणि आम्ही ७३ वर्षांनंतर थॉमस कप जिंकला, याचा खूप आनंद होत आहे." असं श्रीकांत किदम्बी यांनी मोदींना बोलताना सांगितलं.
Web Title: India Won Badminton Thomas Cup Pm Modi Pulela Gopichand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..