साक्षीने मिळविले भारतासाठी पहिले पदक

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 ऑगस्ट 2016

रिओ दी जानिरो - रिओ ऑलिंपिकमध्ये भारताला पहिलेवहिले पदक जिंकून देण्याचा पराक्रम महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने केला. ५८ किलो वजनी गटात तिने किर्गीझस्तानच्या अईसुलू टिनीबेकोवाला ८-५ असे हरवून ब्राँझपदक जिंकले. 

भारतीय वेळेनुसार आज (गुरुवारी) पहाटे 2.51 वाजता ही लढत झाली. साक्षी रशियाच्या व्हॅलेरिया कोब्लोवाकडून हरली. नंतर कोब्लोबाने अंतिम फेरी गाठली. यामुळे साक्षीला रेपीचेजची संधी मिळाली. या सुवर्णसंधीचा फायदा घेत तिने पहिल्या लढतीत मंगोलियाच्या ओर्खोन पुरेवदोर्जला १२-३ असे गुणांवर हरविले होते. 

त्यानंतर टिनीबेकोवाला हिच्याविरुद्धच्या लढतीत साक्षीने विश्रांतीचा फायदा घेत आक्रमक प्रारंभ केला. बचाव आणि आक्रमण याची सांगड घालत उत्तम साक्षीने खेळ केला. साक्षी आणि टिनीबेकोवाला यांच्यातील ही लढत अतीतटीची होती. त्यामुळे सामना क्षणाक्षणाला रंग बदलत होता. पहिल्या तीन मिनिटांत टिनीबेकोवालाने आक्रमक खेळ करत 0-5 अशी बढत मिळवली, परंतू त्यानंतरच्या पुढच्या तीन मिनिटांत साक्षीने आक्रमक पवित्रा घेत सामना 5-5 अशा बरोबरीत आणला. अंतिम क्षणी जोरदार धक्का देउन साक्षीने टिनीबेकोवालाला रिंगणाच्या बाहेर ढकलले आणि 3 गुण मिळवीत विजय मिळविला. हरियानातील रोहतकमधील 23 वर्षीय साक्षी ही ऑलिंपिकमध्ये भारतासाठी पदक जिंकणारी चौथी महिला ठरली आहे.

- कुस्तीपटू साक्षी मलिकला 58 किलो फ्रीस्टाईलमध्ये पदक

- साक्षी मलिकने भारताला पहिले पदक मिळवून दिले

- ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी साक्षी चौथी महिला

- रिओ ऑलिंपिकमधील भारताचे पहिले पदक

Web Title: India won the first medal for the record

व्हिडीओ गॅलरी