
नवी दिल्ली : ‘‘भारत आता स्वत:हून पाकिस्तानशी संबंध सुधारण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकण्यास उत्सुक नाही. कारण सतत विश्वासघात आणि फसवणुकीचाच अनुभव आल्याने भारताने कारवाईतूनच चोख उत्तर दिले,’’ असे काँग्रेस नेते खासदार शशी थरूर यांनी म्हटले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांची पाठराखण करणे थांबवावे आणि संपूर्ण जाळे नष्ट करून जगासमोर प्रामाणिकपणा सिद्ध करावा, असेही थरूर म्हणाले.