भारतातील या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार साप्ताहिक पगार! | IndiaMart Weekly Payout | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Weekly Payout by IndiaMart to Employee
भारतातील या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार साप्ताहिक पगार! | IndiaMart Weekly Payout

भारतातील या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मिळणार साप्ताहिक पगार!

IndiaMart Weekly Payout to Employee: आपण महिनाभर केलेल्या कामाचा पगार आपल्याला प्रत्येक महिना पूर्ण झाल्यानंतर मिळतो. कधी कधी पगार पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी दुसऱ्या आठवड्यात मिळतो. कधी कधी तर पगार (Salary) आणखी उशिरा होतात. त्यामुळे महिनाअखेर होता होता खर्च भागवताना लोकांच्या नाकीनऊ येते. हीच परिस्थिती लक्षात घेऊन परदेशातील काही देशात पगार प्रतिमहिन्याऐवजी प्रतिसप्ताह दिला जात आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा पगार त्यांना प्रत्येक आठवड्याला दिला जातो. भारतातील प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी (E-Commerce Company) इंडियामार्ट आपल्या कर्मचाऱ्यांना आता साप्ताहिक पगार देणार आहे. (IndiaMART, a leading e-commerce company in India, will start paying weekly salaries to its employees)

भारतात मात्र अजूनही महिनाअखेर पगार देण्याची पद्धतच लागू आहे. परंतु भारतातील (India) प्रसिद्ध ई-कॉमर्स कंपनी इंडियामार्ट (IndiaMart) आपल्या कर्मचाऱ्यांना प्रतिमाह ऐवजी प्रतिसप्ताह पगार देणार आहे.

India Mart या B2B ई-कॉमर्स कंपनीने आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून ही माहिती दिली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांवरचा आर्थिक भार हलका होईल आणि त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल असे इंडिया मार्टने म्हटले आहे. या निर्णयासोबत कर्मचाऱ्यांना साप्ताहिक वेतन देणारी इंडिया मार्ट ही पहिली कंपनी बनली आहे.

भारतात साप्ताहीक वेतन ही संकल्पना नवी असली तरी न्युजीलंड, ऑस्ट्रेलिया, हाँगकाँग तसेच अमेरिका यांसारख्या देशात ही गोष्ट सामान्य आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कंपनी आणि कर्मचारी दोघांना फायदा होईल, असं कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं आहे.