PM मोदींनी ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं लोकार्पण केलं ते रामानुजाचार्य कोण होते? | Statue of Equality | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ramanujacharya, Statue Of Equality
PM मोदींनी ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं लोकार्पण केलं ते रामानुजाचार्य कोण होते? | Statue of Equality

PM मोदींनी ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं लोकार्पण केलं ते रामानुजाचार्य कोण होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज ‘स्टॅच्यू ऑफ इक्वालिटी’चं (Statue Of Equality) लोकार्पण करण्यात आलं. 11व्या शतकातील महान समाजसुधारक संत रामानुजाचार्य स्वामीं यांची ही मूर्ती आहे. तब्बल 216 मीटर उंचीची ही मूर्ती जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच मूर्ती ठरली आहे. संत रामानुजाचार्य (Saint Ramanujacharya) यांच्या एक हजाराव्या जयंती वर्षानिमित्ताने ही भव्य मूर्ती उभारण्यात आली आहे. संत रामानुजाचार्य नेमके कोण होते आणि त्यांचे कार्य काय, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Who was Saint Ramanujacharya when PM Modi unveiled the 'Statue of Equality'?)

हेही वाचा: स्टॅच्यू ऑफ युनिटीला तीन लाख पर्यटकांची भेट

संत रामानुजाचार्य कोण होते? (Who was Saint Ramanujacharya?)-

वैष्णव संत रामानुजाचार्य यांचा जन्म 1017 साली तामिळनाडू (Tamilnadu) येथे झाला. कांची येथील अलवर यमुनाचार्य यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली तर श्रीरंगम येथील यतिराज यांच्याकडून त्यांनी संन्यासाची दीक्षा घेतली. समता आणि सामाजिक न्यायाचा पुरस्कार करत त्यांनी भारतभर प्रवास केला आणि वेदांत तसेच वैष्णव धर्माचा प्रचार केला. संत रामानुजाचार्यांनी अनेक संस्कृत ग्रंथांची रचनाही केली. ‘श्रीभाष्यम’ आणि ‘वेदांत संग्रह’ हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. 1137 मध्ये वयाच्या 120 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा: ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ रेल्वेच्याही नकाशावर; केवाडियाला जोडणाऱ्या आठ रेल्वेगाड्या सुरू

भक्तीमध्ये समानतेची शिकवण-

भक्ती, ध्यान आणि वेदांत यांना जातीच्या अडथळ्यांपासून दूर ठेवायला सांगणारे आणि जीवनात धर्म, मोक्ष तसेच जीवनातील समानता याविषयी बोलणारे रामानुजाचार्य हे पहिले संत होते. रामानुजाचार्य हे अन्नमाचार्य, रामदास, कबीर दास आणि मीराबाई यांसारख्या कवींचे प्रेरणास्थान मानले जातात. मोक्षप्राप्तीचे सर्वोत्तम साधन म्हणजे विष्णूची तीव्र भक्ती होय, असं संत रामानुजाचार्य यांनी लोकांना शिकवले. कोणीही कोणत्याही समाजाचा असला, तरी तो देवाच्या कृपेला पात्र आहे, जो स्वतःला पूर्णपणे देवाला समर्पित करेल, त्याच्यावर देवाच्या कृपेचा वर्षाव होईल, असं त्यांनी सांगितले.

रामानुजाचार्यांनी या ३ गोष्टी करण्याचा केला होता संकल्प (Ramanujacharya decided to do these 3 things)-

गुरूंच्या इच्छेनुसार रामानुजाचार्यांनी ब्रह्मसूत्र, विष्णु सहस्रनाम आणि दिव्य प्रबंधम् यावर भाष्य करणे या तीन विशेष गोष्टीं करण्याचा संकल्प केला होता. म्हैसूरमधील श्रीरंगम येथून गेल्यानंतर रामानुज शालिग्राम नावाच्या ठिकाणी राहू लागले. रामानुजांनी त्या प्रदेशात बारा वर्षे वैष्णव धर्माचा प्रचार केला. त्यानंतर त्यांनी वैष्णव धर्माच्या प्रचारासाठी भारतभर प्रवास केला. प्रमुख वैष्णव गुरुंमधील एक असलेल्या रामानुजाचार्यांच्या शिष्यांपैकी रामानंद हे सुद्धा होते, ज्यांचे शिष्य कबीर, रैदास आणि सूरदास हे होते. रामानुजाचार्यांनी लोकांना समानतेची शिकवण दिली.

Web Title: Who Was Saint Ramanujacharya When Pm Modi Unveiled The Statue Of Equality

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Narendra ModiTamil Nadu
go to top