Shaliza Dhami : भारताची कन्या आता थेट पाकिस्तानशी भिडणार; कॅप्टन शालिझा करणार लढाऊ युनिटचं नेतृत्व

भारतीय हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच, एका महिला अधिकाऱ्याला फ्रंटलाइन कॉम्बॅट युनिटची (Frontline Combat Unit) कमान देण्यात आलीये.
IAF Group Captain Shaliza Dhami
IAF Group Captain Shaliza Dhami esakal
Summary

लष्कर आता तोफखान्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पुढाकार घेत आहे.

IAF Group Captain Shaliza Dhami : भारतीय हवाई दलानं (Indian Air Force) ग्रुप कॅप्टन शालिझा धामी यांना पश्चिम क्षेत्रातील आघाडीच्या लढाऊ (Combat) युनिटची कमान हाती घेण्यासाठी नियुक्त करण्यात आलंय.

भारतीय हवाई दलाच्या इतिहासात प्रथमच, एका महिला अधिकाऱ्याला फ्रंटलाइन कॉम्बॅट युनिटची (Frontline Combat Unit) कमान देण्यात आलीये. या महिन्यापासूनच लष्करानं महिला अधिकाऱ्यांना वैद्यकीय प्रवाहाबाहेरील कंमाड असणाऱ्या भूमिका सोपवण्यास सुरूवात केली आहे.

सुमारे 50 महिला अधिकारी ऑपरेशन भागात युनिट्सच्या प्रमुख असतील. एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ यांनी देखील शालिझा धामींचं कौतुक केलंय. सध्या धामी फ्रंटलाइन कमांड मुख्यालयाच्या ऑपरेशन्स शाखेमध्ये तैनात आहेत.

IAF Group Captain Shaliza Dhami
Women's Day 2023 : 'जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय, त्यासाठी..'; राज ठाकरेंची महिलासांठी खास पोस्ट

ग्रुप कॅप्टन धामी या 2003 साली भारतीय वायुसेनेत दाखल झाल्या. त्या हेलिकॉप्टर पायलट म्हणून वायुसेनेत दाखल झाल्या होत्या. धामी यांच्याकडं तब्बल 2800 तास हेलिकॉप्टरचे उड्डाण करण्याचा अनुभव आहे. धामी या पात्र फ्लाइट इन्स्ट्रक्टर असून त्यांनी वायुसेनेच्या पश्चिम कमांडमध्ये हेलिकॉप्टर युनिटच्या फ्लाइट कमांडंट म्हणूनही काम पाहिलं आहे.

IAF Group Captain Shaliza Dhami
Tripura : काँग्रेस सोडून भाजपात दाखल झालेल्या माणिक साहांनी दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

लढाऊ विमानं उडवण्यासाठी 18 महिला वैमानिक

भारतीय हवाई दलात आता मिग-21, मिग-29, सुखोई-30 एमकेआय आणि राफेल यांसारखी लढाऊ विमानं उडवण्यासाठी 18 महिला वैमानिक आहेत. एवढंच नाही तर नौदलात आघाडीवर असलेल्या युद्धनौकांवर अधिकारी म्हणूनही सुमारे 30 महिला कार्यरत आहेत. भारतीय वायुसेना, लष्कर आणि नौदलात 145 हून अधिक महिला हेलिकॉप्टर आणि कार्गो एअरक्राफ्ट पायलट आहेत.

IAF Group Captain Shaliza Dhami
Delhi : सिसोदियांना तुरुंगात पाठवण्यामागं भाजपचं मोठं षडयंत्र; पत्रकार परिषद बोलावून 'आप'नं व्यक्त केली भीती

महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी लष्काराचा पुढाकार

लष्कर आता तोफखान्यात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पुढाकार घेत आहे. यात हॉवित्झर, तोफा आणि रॉकेट प्रणाली हाताळणाऱ्या 280 पेक्षा जास्त तुकड्या आहेत. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीपासून सशस्त्र दलात महिला अधिकाऱ्यांचा समावेश केला जात असला तरी, त्यांच्या 65,000 मजबूत अधिकारी केडरमध्ये त्यांची संख्या केवळ 3,900 आहे. लष्करी वैद्यकीय प्रवाहात स्वतंत्रपणे सुमारे 1,670 महिला डॉक्टर, 190 दंतवैद्य आणि 4,750 परिचारिका आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com