IAF on Standby:इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा निर्णय, भारतीय वायुसेनेला दिले 'हे' आदेश

भारतीय वायुसेना स्टँडबाय मोडवर, इस्राइलध्ये अडकलेल्या भारतीयांना भारतात आणलं जाणार
IAF on Standby:इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा निर्णय, भारतीय वायुसेनेला दिले 'हे' आदेश

Operation Ajay: हमासने इस्राइलवर अचानक हल्ला केला. या हल्ल्यामुळे अनेक भारतीय इस्राइलमध्ये अडकले आहेत. भारत सरकारकडून इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

हमास आणि इस्राइलमध्ये युद्ध सुरु असताना भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेला स्टँडबाय मोडवर ठेवण्यात आलं आहे. याबाबत भारतीय वायुसेनेने गुरुवारी (दि.१२ ऑक्टोबर) माहिती दिली.

इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय वायुसेनेतील सी-१७ (ग्लोबमास्टर), आयएल-७६ आणि सी-१३०जे हे अवजड वाहक विमानांचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इस्राइलमध्ये अडकलेल्या १८,००० भारतीयांना परत आणण्यासाठी 'ऑपरेशन अजय'ची घोषणा केली होती. त्यासाठी गुरुवारपासून नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी 'ऑपरेशन अजय'बद्दल माहिती दिली की,"आज संध्याकाळी एक चार्टर विमान तेल अवीव या ठिकाणी लँड होईल. यामध्ये २३० प्रवासी येऊ शकतात, अशी अपेक्षा आहे. आपल्याकडे दुसरेही पर्याय आहेत, पण वायुसेनेचे महत्व नाकारता येणार नाही." गुरुवारी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून 'ऑपरेशन अजय'च्या तयारीचा आढावा घेतला.

IAF on Standby:इस्राइलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारचा निर्णय, भारतीय वायुसेनेला दिले 'हे' आदेश
Sharad Pawar : विद्यार्थ्यांना गौतमी पाटीलचा नाच दाखवणार काय? शरद पवारांची खरमरीत टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com