जयपूर विमानतळावर हवाई दलाचे विमान खांबाला धडकले अन्...

जयपूर विमानतळावर हवाई दलाचे विमान खांबाला धडकले अन्...

Jaipur News : राजस्थानमधील जयपूर विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. हवाई दलाचे विमान विमानतळावरील खांबाला धडकले. जयपूर विमानतळावर 39 क्रमांकावर हा अपघात झाला. विमान पार्किंग ऍप्रनमध्ये ठेवले जात असताना हा अपघात झाला. विमानाचा काही भाग खांबाला धडकला. मात्र, या काळात विमानाचे फारसे नुकसान झाले नाही. या प्रकरणाची पाहणी सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूर विमानतळाच्या धावपट्टी क्रमांक 39 च्या रनवेवर हवाई दलाचे एक विमान पार्क केल्या जात होते. यावेळी विमान नियंत्रणाबाहेर गेले आणि जवळच्या खांबाला धडकले.

ही घटना घडताच घटनास्थळी घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. वैमानिक आणि उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई केली नसती तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, असे सांगण्यात आले.

जयपूर विमानतळावर हवाई दलाचे विमान खांबाला धडकले अन्...
Narayan Rane: ...अशी उधळली राणेंची सभा, २००५ मधील प्रकरणात ३८ आरोपींवर दोषारोप निश्चित! तेव्हा नेमकं घडलं होतं?

मात्र, ही दिलासा देणारी बाब आहे की, ना विमानाचे कोणतेही नुकसान झाल्याची बातमी नाही ना वैमानिक किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण आली आहे. (Latest Marathi News)

सध्या अशीही माहिती आहे की, हवाई दल आणि जयपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी ही संपूर्ण घटना गांभीर्याने घेतली असून तपास सुरू केला आहे. या घडामोडीबाबत कोणत्याही अधिकाऱ्याने माध्यमांना अधिकृत माहिती दिलेली नाही.

जयपूर विमानतळावर हवाई दलाचे विमान खांबाला धडकले अन्...
Sharad Pawar: "पक्ष सोडून गेलेल्यांची काळजी नाही"; आगामी निवडणुकीसाठी शरद पवारांचा मास्टर प्लॅन!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com