'शांतता हवी, तर घुसखोरी थांबवा'

वृत्तसंस्था
शनिवार, 26 मे 2018

पहलगाम (जम्मू-काश्‍मीर) : पाकिस्तानला सीमारेषेवर शांतता हवी असल्यास त्यांनी दहशतवाद्यांना पाठविणे थांबवावे, असा इशारा भारताचे लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी आज दिला. जम्मू-काश्‍मीरमधील शांततेचे वातावरण कायम राहिल्यास शोधमोहिमा आणि चकमकी आणखी काही काळ बंद ठेवू; पण दहशतवाद्यांनी कारस्थाने केल्यास त्याला तातडीने प्रत्युत्तर दिले जाईल, असेही रावत यांनी स्पष्ट केले.

भारताला शांतता हवी आहे. मात्र, पाकिस्तानकडून सीमारेषेवर सातत्याने तोफगोळ्यांचा मारा होत आहे. पाकिस्तानलाही शांतता हवी असल्यास त्यांनी आधी भारतात दहशतवादी पाठविणे थांबवावे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर होणारे हल्ले दहशतवाद्यांना मदत करण्यासाठीच असतात, असेही रावत म्हणाले. रमजान महिन्यामुळे जम्मू-काश्‍मीरमधील शोधमोहिमा लष्कराने बंद ठेवल्या आहेत.

Web Title: Indian Army Chief General Bipin Rawat statement about border firing