
चित्रकूट: भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी आज (गुरुवार, २९ मे २०२५) चित्रकूट येथे जगद्गुरु रामभद्राचार्य यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, जनरल द्विवेदी यांनी रामभद्राचार्यांकडून 'राम मंत्र दीक्षा' घेतल्याने आध्यात्मिक आणि राष्ट्रीय स्तरावर याची चर्चा सुरू झाली आहे. रामभद्राचार्यांच्या आश्रमात झालेल्या या भेटीत सेनाप्रमुखांनी देशाच्या सुरक्षा स्थितीवरही महत्त्वाचे भाष्य केले.