लष्कराच्या कामाचं कंत्राट देण्यासाठी ५० लाखांची लाच, कर्नलला अटक; CBIच्या कारवाईने खळबळ

The CBI has arrested Indian Army Colonel भारतीय लष्करात कर्नल म्हणून कार्यरत असलेल्या हिमांशु बालीला सीबीआयने अटक केलीय. कंत्राट देण्यासाठी एका कंपनीकडून ५० लाखांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
CBI
CBIesakal
Updated on

सीबीआयने भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या कर्नलला ५० लाखांच्या लाच प्रकरणी अटक केलीय. आरोपी लष्करी अधिकाऱ्याचं नाव कर्नल हिमांशु बाली असं आहे. सध्या तो कोलकात्यात ईस्टर्न कमांड अंतर्गत आर्मी ऑर्डनेन्स कॉर्प्समध्ये तैनात आहे. कर्नल हिमांशुवर आरोप आहेत की त्याने लष्कराचं टेंडर देण्याच्या नावाखाली कानपूरच्या एका कंपनीला फायदा होण्यासाठी पदाचा गैरवापर केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com