VIDEO - प्रशिक्षित श्वान शोधणार कोरोनाचे रुग्ण; लष्कराने घेतली चाचणी

टीम ई सकाळ
Tuesday, 9 February 2021

गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसनं जगात धुमाकूळ घातला आहे. सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. 

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसनं जगात धुमाकूळ घातला आहे. सध्या भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, भारतात लष्कराचे दोन प्रशिक्षित श्वान कोरोना झालाय की नाही हे ओळखू शकतील. युरीन आणि घामाच्या नमुन्यांच्या आधारे ते शोधू शकतील. याचे प्रात्यक्षिक सोमवारी पार पडले. 

कोरोनाबाधितांच्या युरिन आणि घामातून निघणाऱ्या विशिष्ट बायोमेकर्सवर श्वानांना खास प्रशिक्षण देण्यात आलं आहे. आजारी व्यक्तींच्या शरिरातून उत्सर्जन होणाऱ्या बायोमेकर्सचा वापर श्वानांद्वारे आजार शोधण्यासाठी केला जातो असं लष्करातील अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

ब्रिटन, फिनलँड, रशिया, फ्रान्स, युएई, जर्मनी, लेबनॉन या देशांमध्ये विमानतळ, रेल्वे स्टेशन या ठिकाणी प्रवाशांच्या तपासणीसाठी प्रशिक्षित श्वान तैनात केले आहेत. जगात कर्करोग, मलेरिया, मधुमेह, पार्किन्सन यांसारख्या आजारांच्य निदानासाठी अनेक ठिकाणी मेडिकल डिटेक्शन डॉग्जचा वापर केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाच्या डिटेक्शनसाठी प्रशिक्षित श्वानांचा वापर करण्यासाठी हालचाली केल्या जात आहेत. 

हे वाचा - राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक, काँग्रेसच्या नेत्याविषयी बोलताना अश्रू अनावर

प्रशिक्षित श्वानांची चाचणी घेण्यासाठी मेरठमधील लष्करी रुग्णालय आणि नेताजी सुभाषचंद्र बोस सुभारती मेडिकल कॉलेजमधून काही पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांचे नमुने घेतेले होते. कोरोना डिटेक्शनसाठी Chippiparai आणि Cocker Spaniel या दोन श्वानांचा वापर केला गेला. 

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे नवे 9 हजार 110  रुग्ण सापडले आहेत.  देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 कोटी 8 लाख 47 हजार 304 इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात 14 हजार 16 रुग्ण कोरोनामुक्त झाले. देशात आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 48 हजार 521 इतके रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 1 लाख 55 हजार 158 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या देशात 1 लाख 43 हजार 625 सक्रीय रुग्ण आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army dogs trained for detection of COVID19