चीनला धडा शिकवण्यासाठी भारताच्या हालचाली; गस्तीसाठी वापरणार अत्याधुनिक बोटी

टीम ई सकाळ
Saturday, 2 January 2021

 मे महिन्यात लडाखमध्ये भारत चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतर अजुनही तणावाचे वातावऱण आहे.

नवी दिल्ली - भारताच्या सैन्याने पूर्व लडाखमधील पेंगाँग तलावासह इतर जलाशयांवर देखरेख वाढवण्यासाठी 12 अत्याधुनिक गस्त बोटी खरेदीला मंजुरी दिली आहे.  मे महिन्यात लडाखमध्ये भारत चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतर अजुनही तणावाचे वातावऱण आहे. या पार्श्वभूमीवर ही खरेदी महत्त्वाची ठरणार आहे. 

लष्कराने म्हटलं की, उंच भागांमध्ये असलेल्या तलावांसह इतर जलाशयांची देखरेख आणि गस्त गालण्यासाठी 12 बोटींसाठी सरकारी प्रोजेक्ट असलेल्या गोवा शिपयार्ड लिमिटेडसोबत कराराला मंजुरी दिली आहे. यावर स्वाक्षरी झाली असून मे 2021 मध्ये बोटी मिळतील. 

हे वाचा - भारत सुरक्षा समितीचा आठव्यांदा सदस्य

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पेंगाँग तलावासह पर्वतीय भागातील इतर जलाशयांमध्ये पेट्रोलिंग वाढवण्याच्या दृष्टीने बोटींची खरेदी केली जात आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने म्हटलं की, त्यांनी अत्याधुनिक बोटींच्या खेरेदीसाठी गुरुवारी लष्करासोबत एक करार करण्यात आला. यामध्ये बोटींना सुरक्षा दलांना आवश्यक अशी खास उपकरणे लावण्यात येणार आहेत. 

जीएसएलने म्हटलं की,'जीएसएल गोव्यात या बोटी तयार करणार आहे. विशेष सुविधा असलेल्या या बोटी जगातील निवडक बोटींपैकी एक असतील.' पूर्व लडाखच्या विविध भागात भारतीय लष्कराचे जवळपास 50 हून अधिक जवान तैनात आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार चीननेसुद्धा एवढेच सैनिक तैनात केले आहेत. 

हे वाचा - देशातील सहा राज्यांमध्ये राबविण्यात येणार 'एलएचपी' प्रोजेक्ट

पेंगाँग तलावासह आजुबाजुचा भाग हा महत्त्वाचा मानला जातो. भारताने मे महिन्यात चीनसोबत संघर्ष सुरु झाल्यानंतर इथले सैन्य वाढवले होते. दोन्ही देशांमध्ये पाच मे रोजी पेंगाँग तलावाच्या भागात संघर्ष झाला होता. यानंतर 9 मे रोजी उत्तर सिक्किम इथंही असाच प्रकार घडला होता. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: indian-army-GSl agreement-12-specialized-fast-patrol-boats-for-patrolling