देशातील सहा राज्यांमध्ये राबविण्यात येणार 'एलएचपी' प्रोजेक्ट

पीटीआय
Saturday, 2 January 2021

देशातील सहा राज्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबविण्यात येणारा लाईट हाऊस प्रोजेक्ट (एलएचपी) हा गृहप्रकल्प गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. सहकारी संघराज्याही तो बळकटी प्रदान करेल, असेही पंतप्रधान म्हणाले. मोदींच्या हस्ते शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहा राज्यांतील या गृहप्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पार पडला.

नवी दिल्ली - देशातील सहा राज्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राबविण्यात येणारा लाईट हाऊस प्रोजेक्ट (एलएचपी) हा गृहप्रकल्प गृहनिर्माण क्षेत्राला नवी दिशा देईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे व्यक्त केला. सहकारी संघराज्याही तो बळकटी प्रदान करेल, असेही पंतप्रधान म्हणाले. मोदींच्या हस्ते शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहा राज्यांतील या गृहप्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पार पडला.

Covid 19 Vaccine - सीरमच्या लशीला तज्ज्ञांचा हिरवा कंदील; परवानगीसाठी DGCI कडे शिफारस

यात झारखंडसह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, त्रिपुरा व तामिळनाडूचा समावेश आहे. ग्लोबल हाऊसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज इंडिया (जीएचटीसी - इंडिया) अंतर्गत हा गृहप्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पातंर्गत येत्या वर्षभरात सहा शहरांमध्ये प्रत्येकी एक हजार घरे बांधली जातील. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

झारखंडमध्ये एक हजार घरे
झारखंडमध्ये केंद्राच्या ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ या गृहयोजनेतंर्गत गरीब व मध्यवर्गीयांसाठी १,००८ स्वस्त घरे उभारली जात असल्याची माहिती मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी दिली. ते म्हणाले, की झारखंड मागासलेले राज्य असल्याने केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने या अल्प उत्पन्न गटासाठी घरांची निर्मिती केली जाईल. यातील बहुसंख्य घरे कामगारांसाठी असतील.

PM मोदी जगात सर्वाधिक मान्यता मिळालेले नेते; सर्व्हेमध्ये दावा

‘एलएचपी’ची सहा शहरे
इंदूर (मध्य प्रदेश), राजकोट (गुजरात), चेन्नई (तामिळनाडू), रांची (झारखंड), आगरतळा(त्रिपुरा), लखनौ (उत्तर प्रदेश)

केंद्र सरकारचे गरीब व मध्यम-वर्गीयांच्या हक्काच्या घरांना प्राधान्य आहे. गेल्या सहा महिन्यांत सामान्य माणसाचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सरकारने विविध पावले उचलली. येत्या वर्षभरात सहा शहरात प्रत्येकी एक हजार घरे बांधण्याचा संकल्प करण्यात आला आहे आणि तो पूर्ण होईल, असा विश्‍वास आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

23 वर्षांपूर्वी झाली होती तृणमूल काँग्रेसची स्थापना; जाणून घ्या इतिहास?

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LHP project implemented six states of the country