Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Poonch Terror Attack 2024: त्याआधी 22 डिसेंबर 2023 रोजी डेरा की गली भागात लष्कराच्या वाहनांवर हल्ला झाला होता. आता हा तिसरा हल्ला आहे.
Poonch Attack
Poonch AttackEsakal

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी 6.15 वाजता भारतीय हवाई दलाच्या जवानांवर हल्ला झाला, ज्यामध्ये सशस्त्र दहशतवाद्यांनी जारवलीहून त्यांच्या स्टेशन शाहसीतारकडे परतणाऱ्या भारतीय वायुसेनेच्या ताफ्यावर हल्ला केला आणि अंदाधुंद गोळीबार केला, त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून गेले.

या दहशतवादी हल्ल्यात भारतीय वायुसेनेचा एक जवान शहीद झाला, तर चार जवान जखमी झाले. त्यानंतर आता देशभरातील अनेक नेते या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. (Poonch Attack)

जानेवारीनंतर दुसरा हल्ला

पुंछमध्ये लष्कराच्या ताफ्यावर या वर्षातील हा दुसरा हल्ला आहे आणि गेल्या डिसेंबरनंतरचा तिसरा हल्ला आहे.

यापूर्वी १२ जानेवारीला कृष्णा घाटी भागात दहशतवाद्यांनी लष्करी वाहनांना लक्ष्य केले होते, ज्यात चार जवान शहीद झाले होते.

त्याआधी 22 डिसेंबर 2023 रोजी डेरा की गली भागात लष्कराच्या वाहनांवर हल्ला झाला होता. आता हा तिसरा हल्ला आहे. या तीन हल्ल्यांमध्ये पाच जवान शहीद झाले, तर अनेक जवान जखमी झाले.

Poonch Attack
Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

डिसेंबरपासून पुंछमधील तिन्ही हल्ल्यांची मोडस ऑपरेंडी सारखीच आहे. आधीच घुसलेल्या दहशतवाद्यांकडून संध्याकाळी लष्करी वाहनांवर हल्ले केले जात आहेत.

हे हल्ले जंगल भागात होत आहेत. यानंतर दहशतवादी पळून जंगलात लपून बसतात. तसेच अंधाराचा फायदा घेत जंगलातून पळून जात आहेत.

30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान

गेल्या 30 महिन्यांत पूंछमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याची ही सहावी घटना आहे. 2021 पासून सुरू झालेल्या घटनांमध्ये आतापर्यंत 21 जवानांचा बळी गेला आहे. या घटनांमध्ये अनेक जवान जखमीही झाले आहेत.

Poonch Attack
HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

हल्ल्यांची टाइमलाईन:

11 ऑक्टोबर 2021: चामरेड भागात सैनिकांवर हल्ला केला, जेसीओसह पाच जणांचे बलिदान.

20 ऑक्टोबर 2021: भटादुडिया येथे शोध मोहिमेदरम्यान झालेल्या हल्ल्यात सहा जवान शहीद झाले.

20 एप्रिल 2023: भटादुडिया भागात लष्करी वाहनाला घेराव घालण्यात आला, आधी ग्रेनेडने हल्ला, नंतर गोळीबार, पाच जवानांचे बलिदान.

21 डिसेंबर 2023: डेराच्या गली सवानी भागात लष्करी वाहनांवर झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद, दोन जखमी.

12 जानेवारी 2024: दराटी, कृष्णा घाटी येथे लष्करी वाहनांवर गोळीबार, कोणतेही नुकसान नाही.

04 मे 2024: पूंछच्या सुरणकोट भागात हवाई दलाच्या वाहनांवर हल्ला, एक जवान शहीद, चार जखमी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com