Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 14 January 2021

सैन्याचे मेजर अनुप मिश्रा (Major Anoop Mishra) यांनी जगातील पहिली यूनिवर्सल बुलेटप्रुफ जॅकेट (world's first universal bulletproof jacket) विकसित केले आहे.

Army Day 2021- भारतीय सैन्याने (Indian Army) आणखी एका क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. सैन्याचे मेजर अनुप मिश्रा (Major Anoop Mishra) यांनी जगातील पहिली यूनिवर्सल बुलेटप्रुफ जॅकेट (world's first universal bulletproof jacket) विकसित केले आहे. या स्वदेशी बुलेटप्रुफ जॅकेटला शक्ती (Shakti) नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे जॅकेट पुरुष आणि महिला असं दोन्ही परिधान करु शकतात. तसेच हे जॅकेट जगातील पहिले बॉडी आर्मरही (world's first flexible body armour) आहे. 

भारताच्या चुकीच्या नकाशाबाबत WHOवर नाराजी; त्वरित दुरुस्तीसाठी सरकारचं पत्र

भारतीय सैन्याने आपल्या सीमांची देखरेख आणि सुरक्षा आणखी चांगली करण्यासाठी स्विच ड्रोन (Switch drone) खरेदी करण्याचा करार केला आहे. यासंबंधी कागदपत्रांवर स्वाक्षरी झाली आहे. वर्टिकल उड्डान भरणे आणि लँड करणारे हे ड्रोन (vertical take-off & landing drone) 4500 मीटर उंचीवर सलग 2 तास उड्डान करु शकते. 

भारतीय लष्कर सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरत आहे. लष्कर अधिकारी कॅप्टन राजप्रसाद यांनी खाण सुरक्षा आणि आयईडीपासून निपटण्यासाठी मानव रहित रोबोट प्लॅटफार्म (Unmanned Robotic Platforms) विकसित केले आहे. त्यांनी लांबीच्या लक्ष्यावर फायरिंग करण्यासाठी वायरलेस इलेक्ट्रॉनिक डेटोनेशन सिस्टमही (Wireless Electronic Detonation Systems) विकसित केली आहे. या सर्व उपलब्धींना भारतीय लष्कराने प्रदर्शित केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian Army has endogenously developed world first universal bulletproof jacket Shakti