जवानांनी बर्फामध्ये धरला ठेका, काश्मीरचा VIDEO व्हायरल

काश्मीरमध्ये आता नवीन पर्यटन स्थळाला चालना मिळावी, यासाठी हिवाळी महोत्सव आयोजित केलाय.
Winter Festival
Winter Festivalटिम ई सकाळ

भारतीय लष्कराच्या 'डॅगर डिव्हिजन'ने गुलमर्गच्या पर्यटन रिसॉर्टमध्ये काश्मीर पर्यटन विभागाच्या मदतीने तीन दिवसीय हिवाळी महोत्सवाचे आयोजन केले. काश्मीरमधील पर्यटनाला चालना देणे हा महोत्सवाचा महत्त्वपुर्ण उद्देश असून या निमित्त्याने काश्मीर खोऱ्यातील कलाकारांना त्यांच्या कलागुणांना सादर करण्याची संधी मिळणार आहे. (Indian Army 'Dagger Division', in collaboration with Kashmir Tourism Department organized a three day winter festival)

कलम 370 च्या बंधनातून मुक्त झाल्यानंतर, काश्मीरमध्ये आता नवीन पर्यटन स्थळाला चालना मिळावी, यासाठी हिवाळी महोत्सव आयोजित केलाय. या महोत्सवाद्वारे तेथील पर्यटन स्थळे लोकप्रिय करण्यास मदत होणार सोबतच पर्यटनालासुद्धा चालना मिळणार.

Winter Festival
खासगीकरणाने सरकारला ! तोटा बँक कर्मचारी संघटनांची भीती

काश्मीरमधील सर्वोत्तम पर्यटन स्थळे

काश्मीर हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे तुम्हाला वर्षभरात वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी सुंदर दृश्ये पाहायला मिळतात. काश्मीरमध्ये सर्वत्र हिरवीगार भूमी आहे, उंच पर्वत मुख्यतः बर्फाने आच्छादलेले आहेत आणि निसर्गाच्या इतर अद्भुत सौंदर्याचा आनंद इथे घेता येतो.

श्रीनगर हे काश्मीरमधील सर्वात प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. पर्यटकांना येथे हिरवाईने नटलेले पर्वत दिसतात. दाल सरोवर हे श्रीनगरचे मुख्य आकर्षण आहे. हा तलाव शहरातील सर्वात आश्चर्यकारक तलाव आहे. त्याचे दृश्य अतिशय आकर्षक आहे. याशिवाय, शालिमार बाग आणि मुगल गार्डन, इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन आणि निगीन लेक, वुलर लेक आणि परी महल हे सुद्धा तितकेच नयनरम्य आहे.

Winter Festival
सांबा रोडवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

गुलमर्ग हे पीर पंजाल रेंजच्या हिमालयीन खोऱ्यात आहे. प्रसिद्ध हिल स्टेशन असण्याव्यतिरिक्त, गुलमर्ग हे एक अद्भुत स्कीइंग डेस्टिनेशन आहे. आपण येथे फुलांच्या शेती केली जाते. याशिवाय स्कीइंग, माउंटन बाईकिंग, ट्रेकिंग आणि आइस स्केटिंग सारख्या अनेक उपक्रमांचा आनंद आपण घेऊ शकता.

अ‍ॅडव्हेंचरचे शौकिन असलेल्यांसाठी सोनमर्ग ठिकाण नंदनवन आहे कारण येथे अनेक प्रकारचे ट्रेकिंग स्पॉट्स आहेत.ट्रेकिंग, वॉटर रिव्हर राफ्टिंगसाठी हे विशेष प्रसिद्ध आहे. गडसर तलाव, सत्सर तलाव, गंगाबल तलाव, कृष्णासर तलाव आणि विष्णसर तलाव अशी प्रसिद्ध तलावसुद्धा इथे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com