पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन ; महाराष्ट्रातील जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 एप्रिल 2018

महाराष्ट्रातील परभणीतील चाटोरी तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे हुतात्मा झाले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. 

जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सातत्याने केले जात आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या परभणी जिल्ह्यातील जवान हुतात्मा झाला असून, आणखी चार जवान जखमी झाले आहेत. हा गोळीबार जम्मू-काश्मीरमधील पूंच जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास करण्यात आला.  

ceasefire army

जम्मू-काश्मीरच्या पूंच जिह्यातील कृष्णाघाटी येथील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात लष्करातील एका अधिकाऱ्यासह तीन जवान जखमी झाले असून, महाराष्ट्रातील परभणीतील चाटोरी तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे हुतात्मा झाले आहेत. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले. 

दरम्यान, काल (सोमवार) दक्षिण काश्मिरात तीन ठिकाणी अतिरेक्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेत 13 अतिरेक्यांना ठार करण्यात जवानांना यश आले. या चकमकीत तीन जवान शहीद झाले असून, चार नागरिकांचा मृत्यू झाला.

Web Title: Indian Army Jawan Martyr Pakistan Ceasefire one martyr and four injury