भारतीय जवानांकडून दोन पाकिस्तानी सैनिक ठार

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

नियंत्रण रेषेजवळ झालेल्या या गोळीबारात सोमवारी (ता. 13) दोन जवान हुतात्मा झाले होते. तर काही दिवसांपूर्वी मेजर कौस्तुभ राणे हुतात्मा झाले होते.

नवी दिल्ली : भारतीय लष्कराने तंगधर सेक्टरजवळ झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी सैनिकांना सोमवारी (ता. 13) रात्री ठार केले. पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत होते, त्यामुळे भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक मारले गेले, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी दिली. 

मागचे काही दिवस पाकिस्तानचे घुसखोरीचे प्रयत्न सुरू होते, तसेच गोळीबारही करण्यात येत होता. यात काही भारतीय जवानांनाही आपला जीव गमवावा लागला होता.

नियंत्रण रेषेजवळ झालेल्या या गोळीबारात सोमवारी (ता. 13) दोन जवान हुतात्मा झाले होते. तर काही दिवसांपूर्वी मेजर कौस्तुभ राणे हुतात्मा झाले होते.

Web Title: Indian army kills 2 pakistani soldiers