
जम्मू काश्मीरच्या अखनूर इथं मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ आयईडी स्फोटात लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांना वीरमरण आलं. मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास जम्मू जिल्ह्यातल्या खौर ठाण्याच्या हद्दीत केरी बट्टल क्षेत्रात हा स्फोट झाला. यात तीन सैनिक गंभीर जखमी झाले होते. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील दोघांचा उपचारावेळी मृत्यू झाला.