
दोन दिवसांपूर्वी पलक्कड जिल्ह्यात आर बाबू नावाचा तरुण ट्रेकिंगला गेला होता. त्यावेळी तरुणाचा पाय घसरला अन्..
केरळ : केरळमधील पलक्कड (Palakkad, Kerala) येथील कुरुंबाची डोंगराच्या फॉल्ट लाइन (Fault Line) दरीमध्ये 23 वर्षीय तरुण अडकला (Trapped) होता. अडकलेल्या 23 वर्षीय तरुणाला बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्करानं (Indian Army) बचावकार्य (Rescue operations) सुरू केलं होतं. तब्बल 45 तासांनंतर त्या तरुणाची यातून सुटका करण्यात आलीय. सोमवारी तरुण दरीत अडकला होता. त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करताना खाद्यपदार्थ देण्यासाठीसुद्धा त्याच्यापर्यंत जाता येत नव्हतं. अखेर कोस्ट गार्ड हेलिकॉप्टरच्या (Coast Guard Helicopter) मदतीनं तरुणाला वाचवण्यात जवानांना यश आलंय.
भारतीय लष्कराच्या गिर्यारोहक पथकाला अडकलेल्या तरुणांच्या सुमारे 200 मीटरपर्यंत पोहोचण्यात यश आलं. सर्व आधुनिक उपकरणांसह लष्कराचे तज्ज्ञ बचाव कार्यासाठी मलमपुझा येथील चेराड हिलवर पोहोचले होते. आर बाबू असं अडकलेल्या तरुणाचं नाव असून तो मलमपुझा येथील चेराडूतला रहिवासी आहे. सोमवारी दुपारी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील एलाचिराम येथे जवळच्या कुरुंबाची डोंगरावरून खाली उतरत असताना दरीच्या खड्ड्यात तो पडला. आर बाबू आणि इतर तीन मित्र डोंगरावर जात असताना ही घटना घडलीय.
दोन दिवसांपूर्वी केरळच्या पलक्कड जिल्ह्यात आर बाबू नावाचा तरुण ट्रेकिंगला गेला होता. त्यावेळी तरुणाचा पाय घसरला आणि तो दोन टेकड्यांमध्ये अडकला. त्यानंतर बाबूनं आपण अडकल्याची माहिती खाली वाट पाहत असलेल्या लोकांना दिली. दरम्यान, केरळच्या पलक्कड जिल्ह्यात ट्रेकिंगला (Trekking) गेलेला बाबू टेकडीत अडकल्याची घटना आयुष्यभर विसरता येणार नाही.
तरुणाला वाचवण्यासाठी दोन लष्करी अधिकारी, दोन जेसीओ आणि इतर पाच कॉन्स्टेबल काल रात्री वेलिंग्टन येथून घटनास्थळी पोहोचले. भारतीय तटरक्षक दलाच्या चेतक हेलिकॉप्टरनं मंगळवारी बचावकार्याचा प्रयत्न केला. मात्र, खराब हवामानामुळं हे ऑपरेशन पूर्ण होऊ शकलं नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना मोठं यश आलं. भारतीय वायुसेनेनं (Indian Air Force) भारतीय लष्कराची आणखी एक गिर्यारोहक टीम बेंगळुरूहून सुलूरला मलमपुझासाठी पाठवली होती.
आर बाबू पडल्यानंतर त्याच्या साथीदारांनी प्रथम त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश न आल्याने त्यांनी स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. सोमवारी रात्रीपर्यंत यश न मिळाल्याने मंगळवारी पुन्हा प्रयत्न करण्यात आले, परंतु, यश आलं नाही. त्यानंतर बुधवारी सकाळी पुन्हा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना मोठं यश आलं.
जवळपास दोन दिवस आर बाबूंना अन्न-पाणीही मिळालं नाही. यानंतर स्थानिक आमदार ए. प्रभाकरन (MLA A. Prabhakaran) यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हा मंत्री कृष्णनकुट्टी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची माहिती दिली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनीही हस्तक्षेप करत तरुणांना वाचवण्यासाठी भारतीय लष्कराची मदत घेतली. यानंतर बंगळुरूहून हवाई दल आणि लष्कर मदतीसाठी पोहोचले आणि त्या तरुणाला वाचवलं. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सकाळी ट्विटरवरून तरुणाला सुखरुप बाहेर काढण्यात आल्याची माहिती दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.