Army Rescue: १८,६०० फुटांवर मृत्यूशी झुंज! जोरदार वाऱ्यात एका स्किडवर हेलिकॉप्टर उतरवून जखमीची सुटका, आकाशात धाडसाची परीक्षा

Indian Army Rescues Injured Person at 18600 Feet in Ladakh: १८,६०० फूट उंचीवर विरळ हवा, तीव्र उतार आणि वेगवान वाऱ्यांना तोंड देत लष्कराच्या वैमानिकांनी हेलिकॉप्टर एका स्किडवर उतरवून जखमीला दिले जीवनदान; धैर्य, कौशल्य आणि मानवी मूल्यांची अद्वितीय कामगिरी
Ladakh Army Rescue Mission at 18600 Feet Saves Injured Person as Pilot Lands Helicopter on One Skid on Steep Slope

Ladakh Army Rescue Mission at 18600 Feet Saves Injured Person as Pilot Lands Helicopter on One Skid on Steep Slope

sakal

Updated on

श्रीनगर : लडाख विभागातील हिमाच्छादित पर्वतरांगा, विरळ वातावरण, वेगाने वाहणारे वारे आणि तीव्र पर्वतीय उतारामुळे हेलिकॉप्टरच्या संचलनासाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असतानाही, लष्कराच्या हवाई तुकडीने १८,६०० फूट उंचीवरून एका जखमी व्यक्तीची यशस्वी सुटका केली. लष्कराने या मोहिमेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केला असून, वैमानिकासह संपूर्ण तुकडीच्या धाडसाचे आणि अचूक कामगिरीचे कौतुक होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com