मोदींचा 'आत्मनिर्भर भारत'चा नारा; एनडीआरएफ डॉग स्क्वॉडही आता 'स्वदेशी'च!

NDRF_Dog_Squad
NDRF_Dog_Squad

गाझियाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'व्होकल फॉर लोकल' उपक्रमातून प्रेरित होऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) आता डॉग स्क्वॉड (श्वान पथक) मध्ये देशी जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

एनडीआरएफच्या आठव्या बटालियनचे कमांडंट पी. के. तिवारी याबाबत म्हणाले की, 'आतापर्यंत तीन देशी जातीच्या श्वानांना आपत्ती आणि मदत कार्यात मदत करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे.'

तिवारी पुढे म्हणाले की, ''भारतीय जातीचे श्वान कोणत्याही संशयास्पद वस्तूची ओळख पटविणे आणि हाताळण्याच्या क्षमतेत इतर परदेशी जातीच्या श्वानांपेक्षा कमी नाहीत. फक्त त्यांना हाताळण्यासाठी थोडासा संयम आवश्यक आहे. भारतीय श्वानांमध्ये परदेशी श्वानांपेक्षा अधिक जोम आणि चपळता आहे. पूर्वी आम्ही परदेशी श्वानांना प्रशिक्षण द्यायचो. आता आम्ही भारतीय श्वानांनाही प्रशिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

पंतप्रधान मोदींनी 'व्होकल फॉर लोकल' यासाठी देशभरातील नागरिकांना आवाहन केले आहे. या उपक्रमांतर्गतच आम्ही भारतीय जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आम्हाला बर्‍याच अडचणी आल्या, त्यातील काही श्वान पळूनही गेले, परंतु आम्ही काहींना प्रशिक्षण दिले आहे. त्यापैकी आमच्या पथकात तीन श्वानांचा समावेश केला आहे.

यापूर्वी ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी भारतीय जातीचे श्वान घरी पाळण्यासाठी नागरिकांना आवाहन केले होते. तसेच आग्रह धरला होता. त्यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमादरम्यान सांगितले की, भारतीय जातीचे श्वान खूप चांगले आणि सक्षम आहेत. त्यांच्या संगोपनाची किंमतही कमी आहे. तसेच येथील वातावरणाची त्यांना पहिल्यापासून सवय असते. जेव्हा आत्मनिर्भर भारत हा सर्वसामान्यांचा मंत्र बनत आहे, तर यामध्ये कोणीही मागे राहू नये.

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com