अब्जाधीश रतन टाटांनी छोटासा केक कापून साधेपणाने साजरा केला 'वाढदिवस'

Indian businessman Ratan Tata
Indian businessman Ratan Tataesakal
Summary

सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा फोटो बघूनबी संताप येतो; पण..

Happy Birthday Ratan Tata : भारतीय उद्योग जगताचा विषय जेव्हा-जेव्हा निघतो, तेव्हा-तेव्हा काही नावं ओघाओघानं समोर येतात. जागतिक स्तरावर भारताचं नाव उज्वल करणाऱ्या अशाच उद्योजकांमध्ये अग्रगणी आणि प्रचंड सन्मानानं घेतलं जाणारं नाव म्हणजे, रतन टाटा (Ratan Tata). नुकतेच वयाच्या 84 व्या वर्षात उद्योगपती रतन टाटा यांनी पदार्पण केलंय. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे रतन टाटा हे पुत्र आहेत.

सन 1991 मध्ये जे. आर. डी. टाटा हे ‘टाटा सन्स’च्या चेअरमन पदावरून निवृत्त झाले. त्यानंतर कंपनीच्या चेअरमनपदाची जबाबदारी रतन टाटा यांच्या खांद्यावर आली. यानंतर टाटा सन्सनं प्रगतीची अनेक शिखरे गाठली. रतन टाटांची मेहनतच त्याला कारणीभूत आहे. टाटानं रतन टाटांच्या नेतृत्वाखाली अन्य कित्येक कंपन्या आपल्या ताब्यात घेतल्या.

Indian businessman Ratan Tata
ममता बॅनर्जींच्या पक्षानं वाढवली काँग्रेस नेत्यांची चिंता

‘टाटा टी’ या कंपनीनं टेटले कंपनीला, ‘टाटा मोटर्स’ने (Tata Motors) जॅग्वार लँड रोव्हरला आणि ‘टाटा स्टील’नं कोरस कंपनीला आपल्या ताब्यात घेतलंय. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला 2004 साली शेअर बाजारात सूचिबद्ध करण्यात आलं. टाटा यांची यशस्वी उद्योजक, दूरदृष्टी व्यक्ती, देशभक्त आणि सामान्यांप्रती आदर असणारी व्यक्ती म्हणून रतन ओळख आहे. त्यांनी 28 डिसेंबर रोजी आपला वाढदिवस अत्यंत साधेपणानं साजरा केला. छोट्या केकवर लावलेल्या मेणबत्तीला फुंकर मारून त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी साधेपणानं साजरा केलेल्या वाढदिवस व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Indian businessman Ratan Tata
आज रतन टाटांचा वाढदिवस! जाणून घ्या त्यांच्याविषयी 'या' दहा गोष्टी

सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा फोटो बघूनबी संताप येतो; पण..

परवाच, माझ्या एका मित्रानं त्याच्या शुटिंग सेटवरच्या प्राॅडक्शन कंट्रोलरचा वाढदिवस साजरा करतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. 'किरण, आम्ही कसलं एन्जाॅय केलं बघ. म्हन्ला.. चाळीस-बेचाळीस केक आणून त्यात बचाबचा हात बुडवून एकमेकांच्या तोंडावर थापण्याची अक्षरश: रंगपंचमी चालली होती! सगळ्या परिसरात पडणारा केकचा सडा. मूठमूठभर क्रीम हात घेऊन एकमेकांमागे चाललेली पळापळी. केकची फेकाफेकी बघून संताप येत होता. बरं, ज्याचा वाढदिवस साजरा होत होता, त्याचं कर्तृत्व, त्याची लायकी, त्याचं 'कॅरॅक्टर', त्याची नैतिकता अशी आहे की, त्याची वाढदिवसादिवशी खेटरानं पूजा केली तरी कमी हाय! त्याचवेळी एका गल्लीतल्या एका सडकछाप गावगुंडानं तलवारीनं केक कापल्याचा एक फोटो बघूनबी संताप येत होता, अशी फेसबुक पोस्ट शेअर करत अभिनेता किरण माने (Actor Kiran Mane) यांनी आपली भावना व्यक्त केलीय.

रतन टाटांच्या वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर करत माने म्हणाले, आपण या व्हिडिओबद्दल बोलूया.. यात दिसणारा ह्यो मानूस साधासुधा नाय.. ह्यानं चाळीस कोटी केक कापले तरी कमीच हाय यवढं याचं काम हाय.. 'टाटा उद्योगसमूहाला' नवी दिशा देणार्‍या या माणसाचा 'साधेपणा' भल्या-भल्यांना थक्क करणारा हाय भावांनो.. लहानपणीपास्नंच यानं 'आपण जमशेदजी टाटा यांचे नातू आहोत' असा आव आणला नाय... 'टाटा' हे आपलं फक्त आडनांव हाय, आपण आपल्या स्वत्ताच्या बळावर उभं र्‍हायचं या विचारानं झपाटलेला ह्यो गडी! आर्किटेक्ट होण्यासाठी जवा अमेरिकेला गेला, तवा तिथं शिक्षण आणि उमेदवारीच्या दहा वर्षांत या अवलीयानं हाटेलात भांडी घासण्यापास्नं, कारकुनाच्या नोकरीपर्यंत जे जमलं ते केलं!

परत आल्यावर 'टाटा समूहा'त दाखल व्हायच्या आधी जमशेदपूरच्या 'टाटा स्टिल'मध्ये या पठ्ठ्यानं कोळशाची पोती पाठीवरनं वहान्यापास्नं ते धगधगत्या भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच कंपनीची धूरा हातात घेतली. त्यानंतर त्यानं काय केलं ते मी हितं सांगायची गरजच नाय.. नेल्कोवर आनन्यापास्नं ते जग्वार आन् लॅंडरोव्हर इकत घेण्यापर्यंचा इतिहास भुगोल जगाला म्हायतीय.. बापजाद्यांची एकेक प्राॅपर्टी इकून थया-थया नाचणार्‍या भुरट्यांची सद्दी असताना, आधीपास्नं असलेल्यात भर घालून नव्या भरीव गोष्टी इकत घेनाणा ह्यो मानूस मोलाचा ठरतो, तो यासाठीच! ...तर सांगायचा मुद्दा ह्यो की, कालच या माणसानं वयाचा ८४ वा बर्थ डे असा साजरा केला! हे पाहुन, या ठिकाणी आपण सगळ्यांनी स्वत्ताला एक मुस्काडात नाय मारून घेतली, तरी हरकत नाय.. पण, यातनं कायतरी शिकूया, हीच अपेक्षा, अशी पोस्ट शेअर करत मानेंनी रतन टाटांच्या साधेपणाचं तोंडभरुन कौतुक केलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com