
इंग्लंड-अमेरिकेत अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर कुठलीही नोकरी मिळवून बाबासाहेब ऐषोआरामात राहू शकले असते; पण..
Mahaparinirvan Diwas : बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर त्याकाळात..
भारताचे पहिले कायदामंत्री आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Din) आज सामाजिक, राजकीय, सांस्कृतिकपासून ते सिनेसृष्टीतूनही बाबासाहेबांना अभिवादन केलं जातंय. आजच्या महापरिनिर्वाण दिनी अभिनेता किरण माने (Actor Kiran Mane) यांनीही आंबेडकरांना आपल्या खास लेखन शैलीत अभिवादन केलंय.
अभिनेता किरण माने यांनी आपल्या फेसबुक पेजवरती लिहिलंय, ठरवलं असतं तर त्याकाळात इंग्लंड-अमेरिकेत अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर कुठलीही मोठी नोकरी, मानाचं पद मिळवून ऐषोआरामात बाबासाहेब राहू शकत होते. ठरवलंच असतं तर मंत्रीपदं-सत्ता भोगून रग्गड पैसा कमावून गाडी-घोडे उडवले असते. अगदीच काही नाही, तर फक्त वकिली करूनही ऐश्वर्यात बाबासाहेब जगले असते.
हेही वाचा: बहुजनांसाठी क्रांतिसिंहांनी केला स्वतःच्या नोकरीचा त्याग
पण, आपल्या समाजातल्या आधीच्या अनेक पिढ्यांनी जे दु:ख, जी वेदना, जो तिरस्कार, जी हेटाळणी आणि घृणास्पद अस्पृश्यता भोगली. ती पुढच्या पिढ्यांच्या वाट्याला येऊ नये, म्हणून अख्खं आयुष्य खर्ची घालणार्या.. त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणून मानाचं स्थान देण्याचं महानकार्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय, अशी त्यांनी बाबासाहेबांना मानवंदना दिलीय.