
केंद्र सरकारने जनगणनेची अधिसूचना जारी केली असून जनगणना प्रक्रियेला औपचारिक सुरुवात झालीय. २०२७मध्ये ही जनगणना केली जाणार आहे. दरम्यान, अधिसूचनेत जातनिहाय जनगणना असा उल्लेख नसल्यानं विरोधकांनी सरकारवर टीका केलीय. दोन टप्प्यात ही जनगणना केली जाणार आहे. स्वातंत्र्यानंतरची ही आठवी जनगणना असून एकूण १६वी जनगणना असणार आहे. या जनगणनेत ३४ लाख प्रगणक आणि पर्यवेक्षक असतील. तर १.३ लाख जनगणना अधिकारी असणार आहेत.