शेर्पाशिवाय सलग 13 तास चढून त्यांनी केले एव्हरेस्ट सर

वृत्तसंस्था
मंगळवार, 29 मे 2018

टेक्सेंग आणि तामूत यांनी यांनी 24 मे रोजी सकाळी 9 वाजता एव्हरेस्ट शिखर सर केले. डेथ झोन म्हणून ओळखले जाणाऱ्या दक्षिणेकडील कॅम्प चारवरून कोणाच्याही मदतीशिवाय सलग तेरा तासांच्या अविरीत चढाई नंतर भारताचा तिरंगा एव्हरेस्ट शिखरावर फडकावला.

इटानगर : भारतीय गिर्यारोहकांनी शेर्पाची मदत न घेता सलग तेरा तास चढाई करत जगातील सर्वांत उंच शिखऱ माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच पराक्रम करुन दाखविला आहे. 

वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गिर्यारोहक किशॉन टेक्सेंग आणि ताका तामूत यांनी शेर्पाशिवाय सलग तेरा तास चढाई करत एव्हरेस्ट सर केला. एव्हरेस्ट चढाई करत असताना एकाच्या डोक्याला मार लागलेला असतानाही या दोघांनी एवढा मोठा धोका पत्करण्याचा निर्णय घेऊन अखेर एव्हरेस्ट सर केला. या दोघांनी कॅम्प चार येथे जाईपर्यंत ऑक्सिजनचाही वापर केला नाही. हा विक्रमही त्यांनी नोंदविला आहे.   

गिर्यारोहक टेक्सेंग हा सियांग जिल्ह्यातील यिंगकिओंग आणि तामूत हे सियांग जिल्ह्यातील जोमल्लो मोंगूचे येथील आहेत. हे दोघेही 24 मे रोजी एव्हरेस्ट शिखरावर होते. हे दोघे अरुणाचल प्रदेशचे सातवे एव्हरेस्टवीर ठरले असल्याची माहिती राज्य क्रीडा आणि युवा घडामोडींचे संयुक्त संचालक रमेश लिंगी यांनी दिली. 

टेक्सेंग आणि तामूत यांनी यांनी 24 मे रोजी सकाळी 9 वाजता एव्हरेस्ट शिखर सर केले. डेथ झोन म्हणून ओळखले जाणाऱ्या दक्षिणेकडील कॅम्प चारवरून कोणाच्याही मदतीशिवाय सलग तेरा तासांच्या अविरीत चढाई नंतर भारताचा तिरंगा एव्हरेस्ट शिखरावर फडकावला.

माऊंट एव्हरेस्टवर चढाई करत असताना प्रत्येकजण शेर्पाची मदत घेऊनच चढाई करत असतो. त्यांच्यासोबत असणाऱ्या एका शेर्पाला चढाई करत असताना कॅम्प तीनवर दगड कोसळून डोक्याला दुखापत झाली होती. यावेळी या शेर्पाला हेलिकॉप्टरने मदत घेऊन सोडले होते . त्यानंतरही या दोघांनी स्वतः धोका पत्करण्याचा निर्णय घेतला. शेर्पाला गंभीर अवस्थेत काठमांडूला नेण्यात आले आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. कॅम्प चारवर पोहचल्यानंतर त्यांच्या सोबत असणारा एक शेर्पा आजारी पडला. त्यामुळे त्यालाही पुढे शिखर चढाई करण्यापासून रोखण्यात आले. त्यानंतरही त्या दोघांनी स्वतःला एव्हरेस्ट चढाईसाठी सज्ज करत पुढील चढाई केली.
 
किशन टेक्सेंग आणि ताका तामूत यांनी गेल्या चार वर्षांपासून विविध राष्ट्रीय संस्थामधून गिर्यारोहण प्रशिक्षण घेतेले होते. त्यांनी याआधी लडाख येथील माऊंट टोक कांगरी 20,187 फूट हे शिखर सर केले आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखरे सर केली आहेत  ज्यामध्ये तापी मौ (2009), टिन मेना (2011), अंशु जमशेप्पा (2011), निमा लामा (2011), कल्डेन पालोजोर (2011) आणि ताम बागांग (2013) यांचा समावेश आहे.

Web Title: Indian Climbers Reach Everest After 13 Hour Non-Stop Trek Without Sherpas