

Indian Coast Guard Rescues Six Fishermen from Distressed Boat off Mangaluru Coast
esakal
भारतीय तटरक्षक दलाने मंगळुरू किनारपट्टीजवळ समुद्रात अडचणीत सापडलेल्या 'मंजू माथा' या भारतीय मासेमारी नौकेवरील सहा मच्छीमारांची यशस्वी सुटका केली. प्रतिकूल हवामान, खवळलेला समुद्र आणि कमी दृश्यमानता अशा अनेक अडचणींवर मात करत ही शोध व बचाव (SAR) मोहीम सोमवारी सायंकाळी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली.