
घटस्फोटाच्या प्रकरणात कौंटुंबिक न्यायालयाने दिलेल्या पोटगीच्या रकमेत कपात करताना ओरिसा उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचे विधान केले आहे. जर पत्नी सुशिक्षित असेल आणि तिला नोकरीचा अनुभव असेल तर ती घरी बसून पतीकडून पोटगी मागू शकत नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. तिने काम केले पाहिजे. याशिवाय, न्यायालयाने सदर महिलेच्या पोटगीच्या रकमेत कपात करुन ८००० रुपयांवरून ५००० रुपये प्रति महिना केली.