''Moderna-Pfizer पेक्षा भारतात बनवलेल्या लस चांगल्या''

Pfizer आणि Modern या सारख्या लसी भारतात आणल्या गेल्या नाहीत हे चांगले आहे.
pfizer india
pfizer india

Indian Corona Vaccine : मेड इन इंडिया कोविड -19 लसी mRNA सारख्या फायझर आणि मॉडर्ना लसींपेक्षा अधिक चांगल्या असल्याचा दावा सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (SII) सीईओ आदर पूनावाला यांनी बुधवारी केला आहे. भारतीय बनावटीच्या लसींनी कोरोनाव्हायरस संसर्गापासून अधिक संरक्षण प्रदान केले असल्याचेही त्यांनी सांगितले. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदार पूनावाला यांनी ही माहिती दिली आहे. (Adar Poonawalla On Indian COVID Vaccines )

Pfizer आणि Modern या सारख्या लसी भारतात आणल्या गेल्या नाहीत हे चांगले आहे, कारण अमेरिकेसारख्या देशांतील लोकांनी दुसरे आणि तिसरे बूस्टर घेतले आहेत. मात्र, असे असतानाही तेथे अनेकांना कोरोनाची लागण होत आहे. याउलट भारतीय बनावटीच्या लसींनी येथील नागरिकांचे कोरोनापासून तुलनेने चांगले संरक्षण दिले आहे.

pfizer india
भविष्यात शिवसेनेशी युती होऊ शकते; प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य

80 हून अधिक देशांना कोविशील्डचा पुरवठा

पुनावाला म्हणाले की, कोविशील्ड लसींच्या निर्यातीबद्दल बोलताना ते म्हणाले की, भारताने आतापर्यंत 80 हून अधिक देशांमध्ये 100 दशलक्ष डोस निर्यात केले आहेत. मात्र, आता कोरोना रूग्णांच्या घटत्या संसर्गामुळे लसीची मागणी कमी झाली आहे. ज्या देशांमध्ये mRNA लस दिली गेली, तेथे अनेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

pfizer india
खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका; केंद्राकडून वाय प्लस सुरक्षा

बुस्टर डोसमधील अंतर कमी करा; अदर पुनावालांची केंद्राला विनंती

जगासह देशभरात कोरोना रूग्णांची (Corona) संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. दरम्यान, नुकतेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून (Health Ministry) 18 वर्षांवरील सर्वांना कोरोनाचा तिसरा डोस (Booster Dose) देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी दुसरा डोस घेऊन नऊ महिन्यांचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक आहे. या सर्वामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला (Adar Poonawala) यांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याची विनंती केंद्राकडे केली असून, दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर नऊ महिन्यांऐवजी सहा महिन्यांवर करण्याचे आवाहन त्यांनी केंद्राला केले आहे. (Adar Poonawalla On Booster Dose)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com