खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका; केंद्राकडून वाय प्लस सुरक्षा

गृहमंत्री अमित शहांच्या आदेशानंतर नवनीत राणा यांना ही सुरक्षा पुरवली जाणार आहे.
नवनीत राणा
नवनीत राणाइसकाळ

अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना वाय प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या निर्देशानुसार त्यांना ही सुरक्षा व्यवस्था प्रदान करण्यात आल्याची माहिती आमदार रवी राणा यांच्याकडून देण्यात आली. आदेशानंतर नवनीत राणा यांना ही सुरक्षा पुरवली जाणार आहे. नवनीत राणा यांच्या जीवाला धोका असल्याचा गुप्तचर यंत्रणेचा अहवाल असल्यामुळे राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. (Y Plus security To MP Navneet Rana)

नवनीत राणा
''Moderna-Pfizer पेक्षा भारतात बनवलेल्या लस चांगल्या''

खासदार नवनीत राणा या सातत्याने लोकसभेत राज्य सरकारच्या कारभारावर टीका करतात तसेच अनेक ज्वलंत मुद्द्यांना हात घालतात, त्यामुळे त्यांचा जिवाला धोका असल्याचा अहवाल केंद्रीय गुप्तचर यंत्रणेने गृहमंत्रालयाला दिला होता. त्याची गांभीर्याने दखल घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी खासदार नवनीत राणा यांच्या सुरक्षेसाठी ही वाय प्लस सुरक्षा यंत्रणा प्रदान करण्याचे निर्देश दिले. संपूर्ण देशात कुठेही फिरताना आता नवनीत राणा यांना मिळणार वाय प्लस दर्जाचे सुरक्षा कवच मिळाल्याने आता त्यांचा अति महत्त्वाच्या व्यक्तींच्या श्रेणीत समावेश झाला आहे.

केंद्र सरकारने प्रदान केलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत एसपीओ, एनएसजी चे कमांडो, सीएसएफचे बंदूकधारी जवान, शासकीय पायलट कार, दोन स्कॉर्पिओ गाड्या आदी ताफा पुरविण्यात येणार असून आता २४ तास हे सुरक्षा पथक नवनीत राणा यांच्या समवेत राहणार आहे.

नवनीत राणा
मोठी बातमी! सदावर्तेंना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

नवनीत राणा या गेल्या काही दिवसांपासून अमरावतीतील शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याच्या विषयावरून चर्चेत होत्या. या प्रकरणात स्थानिक पोलीस आणि नवनीत राणा यांच्यातील वाद मोठ्या प्रमाणात विकोपाल गेला होता. एवढेच काय तर या प्रकरणी लोकसभेत हक्कभंग प्रस्तावदेखील राणा यांनी दाखल केला होता. त्यानंतर या प्रकरणात अनेक बड्या अधिकाऱ्यांना दिल्लीची वारी करावी लागली होती. तसेच राणा या वेगवेगळ्या राज्य सरकारवर विविध विषयांवर नेहमी टीका करत असतात. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणेकडून केंद्राला देण्यात आला होता. या सर्व घडामोडींनंतर गृहविभागाकडून नवनीत राणा यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिली जाणार आहे.

नवनीत राणा
भविष्यात शिवसेनेशी युती होऊ शकते; प्रकाश आंबेडकरांचे सूचक वक्तव्य

राणा या महत्त्वाच्या मुद्द्यांवरती वेळोवेळी आवाज उठवत असतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे असून, त्यामुळे राणांना यापुढे वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात येणार आहे. वाय प्लस दर्जाच्या सुरक्षेत जवळपास 11 कमांडो, दोन पायलट कार अशी चोवीस तासांसाठीची व्हिआयपी सेवा दिली जाते. यापूर्वी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यानंतर केंद्रातर्फे किरीट सोमय्या यांनादेखील केंद्राकडून झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्यानंतर आता खासदार नवनीत राणा यांनादेखील वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com