

मुंबई : टी-२० ( T 20 world cup) विश्वचषकात भारताची पाकिस्तानविरुद्धच्या (india- pakistan) पराभवानंतर सोशल मीडियावर (social media) ट्रोलर्सने भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीवर (mohammad shami) टीका केली. त्यावर टीम इंडिया कर्णधार विराट कोहलीने (virat kohli) भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू देशासाठी लढत असल्याचं सांगत शमीच्या योगदानाची आठवण करून दिली. यानंतर मात्र, ट्रोलरने विराटच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या. यातून विराटची १० महिन्यांच्या चिमुकली मुलगीही सुटली नाही. मात्र, विराटच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणारे ट्विटर अकाऊंट हे पाकिस्तानातून नसल्याचे समोर आले आहे. काय आहे प्रकरण...
ते twitter account पाकिस्तानचे नाही...तर...
ट्विटरवरील एका अज्ञात अकाऊंटवरून विराट कोहलीच्या लेकीला धमकी आली. यावरून अनेकांनी ट्रोल करणाऱ्यांना धारेवर धरलं तसेच हा विकृतपणा खपवून घेणार नसल्याची भूमिका घेतली. मात्र, यानंतर हे अकाऊंट पाकिस्तानमधील असल्याचा दावा करण्यात आला. ‘अल्ट न्यूज’ (Alt News) या फेक न्यूजची तथ्य तपासणी करणाऱ्या संकेतस्थळाने याबाबत खुलासा केलाय. मग ते अकाऊंट कुठले...?
विराटच्या मुलीला विकृतपणे ट्रोल करणाऱ्याच्या ट्विटर अकाऊंटची तपासणी केली असता हे अकाऊंट पाकिस्तानी नाही तर भारतीयच असल्याचं स्पष्ट झालं. ‘अल्ट न्यूज’ संकेतस्थळाने याबाबत खुलासा केलाय. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (virat kohli) भारतीय क्रिकेट संघातील सर्व खेळाडू देशासाठी लढत असल्याचं सांगत शमीच्या योगदानाची आठवण करून दिली होती. मात्र, यानंतर ट्रोलरने विराटच्या कुटुंबालाही धमक्या दिल्या. यातून विराटची १० महिन्यांच्या चिमुकली मुलगीही सुटली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.