किव्हमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरु होणार : परराष्ट्र मंत्रालय | India | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

S Jayshankar

किव्हमधील भारतीय दूतावास पुन्हा सुरु होणार : परराष्ट्र मंत्रालय

किव्ह : रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine Crises) यांच्यात युद्ध सुरू झाल्यानंतर भारतासह अनेकदेशांनी किव्हमधील दुतावास (Indian ) बंद करण्याचा निर्णय घेतला होता. युद्ध सुरु झाल्यानंतर किव्हमधील भारतीय दूतावासाचे काम तात्पुरत्या स्वरुपात पोलंड येथून चालवण्यात येत होते. मात्र, आता किव्हमधील (Kyiv) भारतीय दूतावास पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. (Indian Embassy Office Resume operation In Kyiv Again)

परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील भारतीय दूतावास, जे तात्पुरते वॉर्सा पोलंड येथे कार्यरत होते, ते 17 मे 2022 पासून किव्हमध्ये पुन्हा कार्यान्वित केले जाणार आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर 13 मार्च 2022 रोजी हे दूतावास तात्पुरते वॉर्सा येथे हलविण्यात आल होते.

हेही वाचा: जम्मू काश्मीर : यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसला आग, 4 जणांचा मृत्यू

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S Jaishankar) यांनी संसदेत सांगितले की, युक्रेनमधील भारतीय दूतावासाने जानेवारी 2022 मध्ये भारतीयांसाठी नोंदणी मोहीम सुरू केली आणि त्याअंतर्गत सुमारे 20,000 भारतीयांनी नोंदणी केली होती. यामध्ये बहुतेक भारतीय नागरिक हे युक्रेनियन विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी होते. ऑपरेशन गंगा (Operation Gaga ) अंतर्गत 18 देशांतील 147 लोकांना युक्रेनमधून सुखरुप बाहेर काढून भारतात आणण्यात आल्याचेही जयशंकर यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Indian Embassy In Ukraine To Resume Operation In Kyiv Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top