भारतीय अभियंत्यांचे अफगाणिस्तानात अपहरण 

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

काबूल : अफगाणिस्तानच्या बाघलान प्रांतामध्ये एका विद्युत कंपनीत काम करणाऱ्या सात भारतीय अभियंत्यांचे एका अफगाणच्या नागरिकासह रविवारी अपहरण करण्यात आले.

एका स्थानिक माध्यमाच्या वृत्तानुसार हे सर्व भारतीय अभियंते सरकारच्या एका वीज कंपनीच्या मिनीबसमधून बाघलान प्रांताची राजधानी पूल ए खोमरेमधील बाघ इ शामल या गावात चालले होते. त्या वेळी त्यांचे गाडीच्या चालकासह अपहरण करण्यात आले.

काबूलमधील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी या अभियंत्यांचे अपहरण झाल्याची पुष्टी केली आहे. हे सर्वजण अफगाणिस्तानातील ब्रेन्शा शेरकत येथील विद्युत कंपनीत कामाला होते, अशी माहिती बाघलान पोलिसचे प्रवक्ते झबिहुल्लाह शाजू यांचा हवाला देऊन वृत्तसंस्थेने दिली आहे.

संपूर्ण अफगाणिस्तानात सुमारे 150 भारतीय अभियंते आणि तंत्रज्ञ विविध प्रकल्पांवर काम करीत आहेत. या अभियंत्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 
 
Web Title: Indian Engineers Kidnapped In Afghanistan

टॅग्स