Haryana Assembly Election: बसप-लोकदलाची हरियानात आघाडी! भाजपच्या सलग तिसऱ्यांदा विजयाच्या स्वप्नाला लागणार सुरूंग?

Haryana Assembly Election : सध्या हरियानात भाजपची सत्ता असून सलग तिसऱ्यांदा विजय मिळविण्याचा भाजपश्रेष्ठींचा विचार आहे.
Haryana Assembly Election
Haryana Assembly Election
Updated on

चंडीगड : हरियानातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय लोकदलाने पुन्हा एकदा बहुजन समाज पक्षासोबत (बसप) आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकदलाचे नेते अभय चौताला हे आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. दोन पक्षांमध्ये झालेल्या आघाडीनुसार नव्वदपैकी ३७ जागा ‘बसप’ लढविणार असून उर्वरित जागा लोकदलाला सोडण्यात आल्या आहेत. सध्या हरियानात भाजपची सत्ता असून सलग तिसऱ्यांदा विजय मिळविण्याचा भाजपश्रेष्ठींचा विचार आहे.

चौताला म्हणाले,‘‘ स्वतःचा स्वार्थ नाही तर लोकांच्या मनातील भावनांचा विचार करूनच आम्ही ही आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सामान्य माणसालाही भाजपने सत्ता सोडावी असे वाटते. हा पक्ष राज्याची लूट करत असून त्याआधी दहा वर्षे काँग्रेसने हे राज्य लुटण्याचे काम केले होते त्यामुळे त्यांनाही लोकांनी नाकारले होते.’’ ही आघाडी निश्चित करण्यासाठी ‘बसप’च्यावतीने राष्ट्रीय समन्वयक आकाश आनंद यांनी चौताला यांच्याशी चर्चा केली होती. ‘‘ राज्यामध्ये आमची आघाडी सत्तेत आली तर चौताला यांना मुख्यमंत्री करण्यात येईल. ही आघाडी केवळ विधानसभेच्या निवडणुकीपुरती मर्यादित नसून आम्ही अन्य निवडणुका देखील एकत्रितपणे लढणार आहोत,’’ असे त्यांनी सांगितले.

Haryana Assembly Election
Assam govt : सरकारी कर्मचाऱ्यांना आसाम सरकार देतंय दोन दिवसांची खास सुट्टी! कारण ऐकून म्हणाल व्वा...

लोकविरोधी सरकार पडेल ः मायावती

या दोन्ही पक्षांकडून आघाडीची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर ‘बसप’च्या सर्वेसर्वा मायावती यांनी ‘बसप’ आणि ‘लोकदल’ हे दोन्ही पक्ष राज्यातील लोकविरोधी सरकारला पराभूत करतील असा विश्वास ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील प्रतिक्रियेतून व्यक्त केला. सध्या हरियाना विधानसभेत लोकदलाचे केवळ चौताला हेच एकमेव सदस्य असून ‘बसप’चा एकही सदस्य नाही.

Haryana Assembly Election
Actress Robbed In Europe: गाडीची काच फोडून कोट्यवधींचं सामान लंपास; पतीसह परदेशात अडकली अभिनेत्री, मायदेशी परतण्यासाठी मागतेय मदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.