Indian Navy : नौदलाची समुद्रात पुन्हा मोठी कारवाई! इराणच्या जहाजासह २३ पाकिस्तानी नागरिकांची केली सुटका

Indian Navy News : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध करून दाखवलं आहे. नौदलानाने अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एक इराणी जहाजाला सुखरूप बाहेर काढले आहे.
 Indian Navy rescues hijacked Iranian vessel with crew of 23 Pakistani Marathi news rak94
Indian Navy rescues hijacked Iranian vessel with crew of 23 Pakistani Marathi news rak94

Indian Navy News : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध करून दाखवलं आहे. भारतीय नेव्हीने एडनच्या खाडीजवळ अपहरणाचा आणखी एक प्रयत्न हाणून पाडत समुद्री चाच्यांच्या तावडीतून एक इराणी जहाजाला सुखरूप बाहेर काढले आहे. मासेमारी करणाऱ्या या इराणी जहाजासह २३ पाकिस्तानी क्रू मेबर्संना देखील सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. तब्बल १२ तासांहून अधिक वेळ चाललेल्या या ऑपरेशनबद्दल नौदलाने माहिती दिली आहे.

गुरूवारीच जहाज समुद्री चाच्यांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर नौदलाने त्यांच्या सुटकेसाठी मोहिम सुरू केली होती. आमची विशेष टीम त्या प्रदेशाचा तपासणी करेल, जेणेकरून तो भाग मासेमारी करणे तसेच इतर कामांसाठी सुरक्षित होईल, अशी माहिती भारतीय नौदलाने जारी केलेल्या निवेदनात देण्यात आली आहे.

भारतीय नौदलाने एडनच्या खाडीजवळ समुद्री चाच्यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आणि कित्येक तासांच्या कारवाईनंतर २३ पाकिस्तानी नागरिक चालक दलाला भारतीय नौदलाने रेस्क्यू केले. तसेच इराणी मासेमारी जहाज अल कंबर ७८६ वरील समुद्री चाच्यांनी आत्मसमर्पण केले, नौदलाला २८ मार्च संध्याकाळी इराणी मासेमारी जहाज अल कंबर ७८६ वर समुद्री चाच्यांनी हल्ला केल्याची माहिती मिळाली होती.

 Indian Navy rescues hijacked Iranian vessel with crew of 23 Pakistani Marathi news rak94
IPL 2024 RCB vs KKR : कोलकाताचा धडाकेबाज विजय ; विराटच्या ८३ धावांनंतरही बंगळूरचा पराभव

ही माहिती मिळताच नौदलाने समुद्री सुरक्षा ऑपरेशनसाठी अरबी सागरात तैनात दोन जहाजांना इराणी जहाजाच्या रेस्क्यूसाठी रवाना केले. नौदलाने आपल्या निवेदनात सांगितले की, या घटनेवेळी जहाज सोकोट्रापासून तब्बल ९० एनएम दक्षिण पश्चिमेत होते आणि समुद्री चाचे या जहाजावर होते. अपहरण झालेल्या एफव्हीला २९ मार्च रोजी थांबवण्यात आले.

सोकोट्रा बेटे एडन खाडीजवळ हिंदी महासागरात आहेत, येथे नुकतेच व्यापारी जहाजांवर हल्ले वाढल्याने भारतीय नौदलाने आपलं लक्ष वाढवलं आहे.

पाच जानेवारी रोजी भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांकडून अपहरण झाल्यानंतर लायबेरीयाचा ध्वज असलेले जहाज एमव्ही लीला नोरफोकला सोमालीच्या किनाऱ्यावरून रेस्क्यू केले होते. २३ मार्च रोजी नोदलाचे स्टाफ प्रमुख अॅडमिरल आर हरि कुमार यांनी सांगितलं की हिंदी महासाहर क्षेत्रातला अधिक सुरक्षित करण्यासाठी आवश्यक ती कारवाई केली जाईल.

 Indian Navy rescues hijacked Iranian vessel with crew of 23 Pakistani Marathi news rak94
IPL 2024 LSG vs PBKS : पहिल्या विजयासाठी लखनौ सज्ज ; पंजाब किंग्सविरुद्ध आज घरच्या मैदानावर लढत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com