काय सांगता, बारावी पाससाठी नौदलात 2700 जागांची भरती!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 जून 2019

भारतीय नौसेनात 2700 पदांसाठी भरती निघाली आहे. नियुक्त उमेदवारांचे मासिक उत्पन्न 21, 700 ते 69,100 पर्यंत राहील. 

भारतीय नौसेनाकडून सेलर (AA, SSR) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. याविषयी नौदलाकडून अधिकृतपणे जाहिर करण्यात आले आहे. जर तुम्हालाही या भरतीप्रक्रियेत अर्ज करायचा असेल आणि या पदांसाठी तुम्ही पात्र आहात तर पुढे या भरतीबाबत संपूर्ण माहिती पुढे देत आहोत.

भरती पदांची माहिती :
'एए'चे 500 आणि 'एसएसआर'चे 2200 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. या भरतीत एकुण 2700 पदांची नियुक्ती केली जाईल. 

पात्रता : 

  • विज्ञान शाखेतून 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक. 
  • एमआर पदांसाठी 10वी उत्तीर्ण सुध्दा अर्ज करु शकतील.
  • या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचा जन्म 1 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2003 पर्यंत झालेला असायला पाहिजे.

अर्ज शुल्क :
खुल्या प्रवर्गातील आणि ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 205 रुपये आहे. SC/ST उमेदवारांसाठी अर्ज शुल्क नाही. 

अर्ज करण्याची तारीख : 
अर्ज प्रक्रिया सुरु - 28 जून 2019
अर्ज प्रक्रिया समाप्त  - 10 जुलै 2019

असा करा अर्ज :
इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करावे. नियुक्त उमेदवारांचे मासिक उत्पन्न 21, 700 ते 69,100 पर्यंत राहील. 

असा भरावा अर्ज :

  • अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in ओपन करावी.
  • होम पेजवरील 'करियर आणि जॉब्स' या ऑप्शनवर क्लिक करणे.
  • 'Become a sailor' वर क्लिक करणे.
  • विचारलेली माहिती भरणे आणि पदांसाठी अर्ज करणे.

या भरतीसंबंधी नोटिफिकेशन बघण्यासाठी येथे क्लिक करा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Indian navy sailors recruitment 2019 for 12th pass