
लांब पल्ल्याचा आरामदायी आणि स्वस्तातला प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिलं जातं. रेल्वेच्या प्रवाशांसाठी रेल्वेकडून सातत्याने सुधारणा केल्या जातात. दरम्यान, तिकिट बुकिंग आणि आरक्षण याबाबत प्रवाशांकडून नेहमीच नाराजी व्यक्त केली जाते. आता बूकिंगबाबत रेल्वेनं मोठा निर्णय घेतला आहे. याआधी रेल्वे सुटण्याच्या चार तास आधी रेल्वे तिकिट कन्फर्म झाल्याचं समजत होतं. पण नव्या सिस्टिमवर रेल्वे काम करत असून कन्फर्म सीट २४ तास आधीच समजणार आहे.